Wednesday, October 20, 2010

सायबर गुन्हे विषयक कायद्याची माहिती सर्वानाच हवी!

मला आलेल्या अश्लील,अपमानकारक व शिविगाल करणार्या मजकुराच्या ई मेल विषयी मी सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पूर्ण तपासांती माहिम विधानसभा मतदारासंघाचा ब्लोक अध्यक्ष हेमल जोशी याला अटक करण्यात आली. राजकीय हेव्यादाव्यातून मानसे किती खालच्या पातलीवर उतारू शकतात याचा अनुभव आला. राजकीय दृष्टया आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी अनेक डावपेच आखले जातात परन्तु मानसिकदृष्ट्या देखिल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी अशा मार्गांचा अवलम्ब  केला जातो. या निमित्ताने सायबर गुन्हे अन्वेषण विभागामधे वारंवार जावे लागले. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व तपास करताना कसास लागणारे सम्बंधित अधिकार्यांचे बुद्धिकौशल्य अचंबित करणारे होते. अश्लील वा धमकिचे एसएम्एस किंवा ई मेल,फसवणुक करण्याच्या किंवा बदनामी करण्याच्या हेतूने पाठाविलेले ई मेल आदींचा सायबर गुन्ह्यांमधे समावेश होतो.तथापि काही गुन्हे माहिती तंत्रन्यान कायद्यातील तरतूदींची माहिती नसल्याने घडतात तसेच कित्येकदा सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेलेही कायादाविषायक योग्य माहितिअभावी तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहित. संगणक हाच जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या तरूण पिढीला तर याविषयी सतर्क करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महाविद्यालये व शालाशालातुन विद्यार्थ्याना जागरूक करणारे कार्यक्रम व्हावयास हवेत. उपरोक्त गुन्ह्याचा अविरत परिश्रम करून तपास करणारे पोलिस निरीक्षक श्री मुकुंद पवार यांचे व त्यांच्या सहकार्यांचे  आभार व्यक्त करताना मी त्यांचे अशा प्रकारे सायबर गुन्ह्यांसम्बन्धी योग्या मार्गदर्शन करणारे उपक्रम राबविल्याबद्दल अभिनन्दन करतो. 

No comments:

Post a Comment