Saturday, October 9, 2010

बुद्धिवादी आत्मकेंद्रित विरोध समाजासाठी आत्मघातकी

शिवाजी पार्क मधे विशिष्ट मर्यादेमधे राजकीय मेलावे होण्यास काही हरकत नसावी असे माझे  मत आहे कारण लोकाशाहीमाधे भाषण स्वातन्त्र्य व मत  स्वातंत्र्य असताना त्यासाठी जागा उपलब्ध नसावी म्हणजे एक प्रकारे अशा स्वातंत्र्याची  गलचेपीच ठरेल.तसेच कोली महोत्सव,मालवणी जत्रा,कोल्हापूर महोत्सव,करीअर फेसिवल,ग्रन्थ जत्रा,एवढेच काय अगदी वडा पाँव सम्मेलनासुद्धा समाजाची गरज आहे.सांस्कृतिक जडघडनिसाठी हे सारे आवश्यक आहे.शिवाजी पार्क परिसरातील नागारिकाना होणारा ध्वनि प्रदूषण व अन्य त्रास जरी मान्य केले तरी राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमाना बंदी घालने समाजासाठी आत्माघाताकी असू शकेल.शिवाजी पार्क च्या परिसरातील नागरिकाना जसा ध्वनि प्रदूषनाचा त्रास होतो तसाच त्रास किंबहुना जास्त त्रास या शहरामधे रेल्वे लाईनच्या लगत झोपदपत्त्यातुन,चालीतून रहानार्या लाखो लोकाना होत असतो.त्यावर  उपाय निघाले तर उत्तमच परन्तु व्यापक हिताच्या द्रुश्तिकोनातून असे त्रास सहन करने अपरिहार्य ठरते. मध्ध्यन्तरी शिवाजी पार्क च्या नाक्यावर व रानडे रोडवर होणार्या स्कायवोकलाही विरोध झाला व योजना हानून पाडण्यात आली.आजच या ठिकाणी रस्ता ओलांडताना शाळेत जाणारी मुले,महीला, व वृद्धांची होणारी ताराम्बल पाहिली तर भविष्यामधे वाधनारी वाहतूक लक्षात घेता पुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार विरोध करानार्यानी केला नसावा असे वाटते. अन्यथा त्यानी विधायक सूचना केल्या असत्या.

समाजातील बुद्धिवादी उच्चभ्रू वर्ग कधी कधी आत्मकेंद्रित होऊंन आक्रामक होतो व समस्यांकडे कोणत्या नजरेतून  पहातो याची ही उदाहरणे आहेत.दुर्दैवाने राजकीय पक्ष व संघटना आणि लोकप्रतिनिधीही या समोर नांगी टाकून, दिशा दर्शाकाचे काम करण्याऐवजी सूरात सूर मिसलतात व लोकप्रियता मिलाविन्याच्या स्पर्धेमधे आपण मागे तर रहाणार नाही ना? याची कालजी घेतात. यातूनच स्वतःपुरेसा विचार करनार्यांची भीड़ चेपत जाते.  

No comments:

Post a Comment