Thursday, February 17, 2011

होर्डीन्ग्जच्या प्रश्नाच्या मुळाशी जावून उपाय शोधा!

शहराच्या विद्रुपीकरणास हातभार लावणार्या  होर्डिंगबाबत सध्ध्या बरीच चर्चा सुरू आहे. होर्डींग्जच्या उपद्रवाचे समर्थन कुणीही करणार नाही.परंतु या चर्चेने इतरही काही प्रश्न उपस्थित केले आहेत व त्यांचीही दखल घेणे गरजेचे आहे. केवळ राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यानी लावलेले होर्डींग्ज बकालीकरणामध्ये भर घालतात का? याचे उत्तर स्पष्टपणे 'नाही' असेच द्यावे लागेल.शहरातील व्यावसायिक स्वरूपाच्या 'जाहिरात फलकाची  गणना करून त्यातील शुल्क भरून परवानगी घेतलेले किती व महापालिकेचा महसूल बुडवून अधिकार्यांच्या संगनमताने लावलेले किती हे तपासून पाहिले तर शहराचे सौंदर्य बिघडविन्यामध्ये   अनधिकृत जाहिरात फलकांचा वाटा फार मोठा आहे हे दिसून येईल.अलीकडेच,महापालिकेच्या फक्त एकाच विभागामध्ये लोकाप्रतीनिधीच्या तक्रारीमुळे व सतत पाठपुरावा केल्यामुळे फक्त दोन दिवसामध्ये मोबाईल व शीत पेयांचे ५६ जाहिरात फलक काढून टाकण्यात आले हे उदाहरण बोलके आहे.
राजकीय कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणारे होर्डीन्ग्ज स्वतःची किंवा नेत्याची व पक्षाची प्रतिमा उजळविण्यासाठी लावले जातात व त्यामध्ये 'वाढदिवस','अभिनंदन इ.प्रकारचे तसेच कामाची,कार्यक्रमाची वा संदेश देणारी होर्डींग्ज प्रामुख्याने असतात.पहिल्या प्रकारच्या होर्डीन्ग्जचा उबग येणे स्वाभाविक आहे. परंतू दुसऱ्या प्रकारचे कामासंबंधी,कार्यक्रमासंबंधी अथवा संदेश देण्यासाठी, होर्डींग्ज व्यतिरिक्त अन्य कोणताही स्वस्तामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. जनतेसाठी संदेश वा सांस्कृतिक कार्यक्रमांची (कोळी महोत्सव,करिअर मार्गदर्शन इ.) जाहिरात ही समाजाचीही गरज आहे. म्हणून वाढदिवस,अभिनंदन आदी होर्डीन्ग्ज वर जरूर बंदी आणा परंतु आवश्यक होर्डीन्ग्जसाठी  प्रत्येक विभागामध्ये विशिष्ट संख्येमध्ये व आकारामध्ये ,विशिष्ट ठिकाणी व एकाच व्यक्तीला वा संस्थेला अनुमती द्यावयाच्या संख्येवर मर्यादा निश्चित करून,धोरण ठरविणे गरजेचे आहे. अश्या होर्डींग्जना  सवलतीचे शुल्क आकारणे योग्य ठरेल अन्यथा होर्डींग्ज लावणे ही केवळ धनदांडग्या कार्यकर्त्यांची मक्तेदारी होउन बसेल. विभागामध्ये निश्चित केलेल्या विशिष्ट जागांव्यतिरिक्त अन्यत्र लागलेल्या होर्डींग्ज वर कारवाई करण्याचे अधिकार व जबाबदारी संबधित अधिकार्याची राहील. लोकशाहीमध्ये नुसते निर्बंध आणणे नव्हे तर योग्य पद्धतीने लोकांपर्यंत  पोहोचण्यास सहाय्यभूत होणेही अपेक्षित आहे. 

Thursday, February 3, 2011

"धारावीचा जनताभिमुख विकास म्हाडानेच करावा

बहुचर्चित 'धारावी पुनर्विकास प्रकल्प' हा दीर्घकाल प्रतिक्षेत असलेला प्रकल्प बड्या बिल्डरान्च्या घशात जाण्याची शक्यता मावळत चालल्याने  धारावीच्या विकासाचे व पर्यायाने आपल्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न साकार होणार असे आशेचे किरण धारावीच्या रहिवाश्याना  दिसत आहेत. ३ के या बदनाम कलमाच्या आधारे हजारो कोटी रुपयांचा मलीदा खाजगी विकासकाना चारन्याचा उद्योग मुलाताच धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सुरू झाला होता.कुंभार वाडा,कोली वाडा,महापालिका वसाहाती,छोटे उद्योजक व व्यावसायिक तसेच धार्मिक स्थलान्च्या भवितव्याबाबत प्रश्न चिन्हच उभे राहिले होते व म्हणूनच धारावीच्या जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद या प्रकल्पाला लाभला नव्हता ही वस्थुतिथी आहे. म्हाडाने हा धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिक जनताभिमुख करून राबविल्यास हा रेंगाळत पडलेला प्रकल्प निश्चितच वेगाने पुढे जाईल यात शंका नाही.
सन २००० च्या पत्र झोपदेधाराकास अगदी पोतमाल्यावर रहानार्यासही  ४०० चौ. फूताचे घर,पारंपारिक उद्योग व व्यवसायिकाना योग्य पर्यायी जागा तसेच प्रकल्पामधे सर्व आवश्यक सार्वजनिक सुविधांची (शाला व महाविद्यालय,इस्पितले व दवाखाने,क्रीडांगने व उद्याने,वाचानालाये व अब्यासिका इ.) पुरेश्या प्रमाणात तरतूद, या धारावीच्या रहिवाश्यान्च्या प्रमुख मागण्या आहेत.खरे तर या मागण्यामधे गैर  असे काहीच नाही. परन्तु गडगंज नफ्याला चटावलेल्या विकासकानी व त्यांच्या रक्षणकर्त्या नोकरशहानी झारीताल्या शुक्राचार्याची भूमिका पार पाडली. दुर्दैवाने धारावीबाबत पूतना मावाशीचे प्रेम वाटनार्या नेत्यानीही या कड़े दुर्लक्ष केले. परिणामी जनतेमधे प्रकल्पाविषयी  अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले व धारावी विकासाचे घोंगडे भिजत पडले. 
बिल्डर ,नोकरशाहा व राजकारणी यांच्या युतीपासून मुम्बई वाचवायचा निर्धार केलेल्या मु.पृथ्वीराज चव्हान यानी धारावीचा विकास म्हाडा मार्फत करण्याचे सूतोवाच करून एक पाऊल पुढे टाकले आहे. बांधकाम क्षेत्रातील नामवंत कम्पन्याना बांधाकामाचे  काम सोपवून,अतिरिक्त नफ्यातून धारावी वासियांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची तरतूद करता येइल.तसेच मुम्बईतील सामान्यांसाठी परवडनार्या  कीमतीची घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेता येइल. काही विक्रियोग्य भूखंड निविदा मागवून विकल्यास मोठ्या प्रमाणात महसूल ही  प्राप्त होईल.दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हान यांचा हा 'लोकहितकारी मनसुबा हानून पाडन्यास पक्षभेद  विसरून अनेक नेत्यांनी म्हाडाच्या विरोधात एका सुरात ओरड सुरू केली आहे. या मागे 'धारावी बचाव आहे की खाजगी विकासक बचाव' हा हेतू आहे. याचा विचार धारावीवासियानी व मुख्यमंत्र्यानिही करावा.