Thursday, February 17, 2011

होर्डीन्ग्जच्या प्रश्नाच्या मुळाशी जावून उपाय शोधा!

शहराच्या विद्रुपीकरणास हातभार लावणार्या  होर्डिंगबाबत सध्ध्या बरीच चर्चा सुरू आहे. होर्डींग्जच्या उपद्रवाचे समर्थन कुणीही करणार नाही.परंतु या चर्चेने इतरही काही प्रश्न उपस्थित केले आहेत व त्यांचीही दखल घेणे गरजेचे आहे. केवळ राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यानी लावलेले होर्डींग्ज बकालीकरणामध्ये भर घालतात का? याचे उत्तर स्पष्टपणे 'नाही' असेच द्यावे लागेल.शहरातील व्यावसायिक स्वरूपाच्या 'जाहिरात फलकाची  गणना करून त्यातील शुल्क भरून परवानगी घेतलेले किती व महापालिकेचा महसूल बुडवून अधिकार्यांच्या संगनमताने लावलेले किती हे तपासून पाहिले तर शहराचे सौंदर्य बिघडविन्यामध्ये   अनधिकृत जाहिरात फलकांचा वाटा फार मोठा आहे हे दिसून येईल.अलीकडेच,महापालिकेच्या फक्त एकाच विभागामध्ये लोकाप्रतीनिधीच्या तक्रारीमुळे व सतत पाठपुरावा केल्यामुळे फक्त दोन दिवसामध्ये मोबाईल व शीत पेयांचे ५६ जाहिरात फलक काढून टाकण्यात आले हे उदाहरण बोलके आहे.
राजकीय कार्यकर्त्यांकडून लावण्यात येणारे होर्डीन्ग्ज स्वतःची किंवा नेत्याची व पक्षाची प्रतिमा उजळविण्यासाठी लावले जातात व त्यामध्ये 'वाढदिवस','अभिनंदन इ.प्रकारचे तसेच कामाची,कार्यक्रमाची वा संदेश देणारी होर्डींग्ज प्रामुख्याने असतात.पहिल्या प्रकारच्या होर्डीन्ग्जचा उबग येणे स्वाभाविक आहे. परंतू दुसऱ्या प्रकारचे कामासंबंधी,कार्यक्रमासंबंधी अथवा संदेश देण्यासाठी, होर्डींग्ज व्यतिरिक्त अन्य कोणताही स्वस्तामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही. जनतेसाठी संदेश वा सांस्कृतिक कार्यक्रमांची (कोळी महोत्सव,करिअर मार्गदर्शन इ.) जाहिरात ही समाजाचीही गरज आहे. म्हणून वाढदिवस,अभिनंदन आदी होर्डीन्ग्ज वर जरूर बंदी आणा परंतु आवश्यक होर्डीन्ग्जसाठी  प्रत्येक विभागामध्ये विशिष्ट संख्येमध्ये व आकारामध्ये ,विशिष्ट ठिकाणी व एकाच व्यक्तीला वा संस्थेला अनुमती द्यावयाच्या संख्येवर मर्यादा निश्चित करून,धोरण ठरविणे गरजेचे आहे. अश्या होर्डींग्जना  सवलतीचे शुल्क आकारणे योग्य ठरेल अन्यथा होर्डींग्ज लावणे ही केवळ धनदांडग्या कार्यकर्त्यांची मक्तेदारी होउन बसेल. विभागामध्ये निश्चित केलेल्या विशिष्ट जागांव्यतिरिक्त अन्यत्र लागलेल्या होर्डींग्ज वर कारवाई करण्याचे अधिकार व जबाबदारी संबधित अधिकार्याची राहील. लोकशाहीमध्ये नुसते निर्बंध आणणे नव्हे तर योग्य पद्धतीने लोकांपर्यंत  पोहोचण्यास सहाय्यभूत होणेही अपेक्षित आहे. 

Thursday, February 3, 2011

"धारावीचा जनताभिमुख विकास म्हाडानेच करावा

बहुचर्चित 'धारावी पुनर्विकास प्रकल्प' हा दीर्घकाल प्रतिक्षेत असलेला प्रकल्प बड्या बिल्डरान्च्या घशात जाण्याची शक्यता मावळत चालल्याने  धारावीच्या विकासाचे व पर्यायाने आपल्या सर्वांगीण प्रगतीचे स्वप्न साकार होणार असे आशेचे किरण धारावीच्या रहिवाश्याना  दिसत आहेत. ३ के या बदनाम कलमाच्या आधारे हजारो कोटी रुपयांचा मलीदा खाजगी विकासकाना चारन्याचा उद्योग मुलाताच धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सुरू झाला होता.कुंभार वाडा,कोली वाडा,महापालिका वसाहाती,छोटे उद्योजक व व्यावसायिक तसेच धार्मिक स्थलान्च्या भवितव्याबाबत प्रश्न चिन्हच उभे राहिले होते व म्हणूनच धारावीच्या जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद या प्रकल्पाला लाभला नव्हता ही वस्थुतिथी आहे. म्हाडाने हा धारावी पुनर्विकास प्रकल्प अधिक जनताभिमुख करून राबविल्यास हा रेंगाळत पडलेला प्रकल्प निश्चितच वेगाने पुढे जाईल यात शंका नाही.
सन २००० च्या पत्र झोपदेधाराकास अगदी पोतमाल्यावर रहानार्यासही  ४०० चौ. फूताचे घर,पारंपारिक उद्योग व व्यवसायिकाना योग्य पर्यायी जागा तसेच प्रकल्पामधे सर्व आवश्यक सार्वजनिक सुविधांची (शाला व महाविद्यालय,इस्पितले व दवाखाने,क्रीडांगने व उद्याने,वाचानालाये व अब्यासिका इ.) पुरेश्या प्रमाणात तरतूद, या धारावीच्या रहिवाश्यान्च्या प्रमुख मागण्या आहेत.खरे तर या मागण्यामधे गैर  असे काहीच नाही. परन्तु गडगंज नफ्याला चटावलेल्या विकासकानी व त्यांच्या रक्षणकर्त्या नोकरशहानी झारीताल्या शुक्राचार्याची भूमिका पार पाडली. दुर्दैवाने धारावीबाबत पूतना मावाशीचे प्रेम वाटनार्या नेत्यानीही या कड़े दुर्लक्ष केले. परिणामी जनतेमधे प्रकल्पाविषयी  अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले व धारावी विकासाचे घोंगडे भिजत पडले. 
बिल्डर ,नोकरशाहा व राजकारणी यांच्या युतीपासून मुम्बई वाचवायचा निर्धार केलेल्या मु.पृथ्वीराज चव्हान यानी धारावीचा विकास म्हाडा मार्फत करण्याचे सूतोवाच करून एक पाऊल पुढे टाकले आहे. बांधकाम क्षेत्रातील नामवंत कम्पन्याना बांधाकामाचे  काम सोपवून,अतिरिक्त नफ्यातून धारावी वासियांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची तरतूद करता येइल.तसेच मुम्बईतील सामान्यांसाठी परवडनार्या  कीमतीची घरे बांधण्याचा कार्यक्रम हाती घेता येइल. काही विक्रियोग्य भूखंड निविदा मागवून विकल्यास मोठ्या प्रमाणात महसूल ही  प्राप्त होईल.दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हान यांचा हा 'लोकहितकारी मनसुबा हानून पाडन्यास पक्षभेद  विसरून अनेक नेत्यांनी म्हाडाच्या विरोधात एका सुरात ओरड सुरू केली आहे. या मागे 'धारावी बचाव आहे की खाजगी विकासक बचाव' हा हेतू आहे. याचा विचार धारावीवासियानी व मुख्यमंत्र्यानिही करावा.                                                                                          

Saturday, January 29, 2011

एकाच कुटुम्बामधे अनेक सत्तास्थाने नकोत

महाराष्ट्राच्या  दौऱ्यावर आलेल्या राहूल गांधीनी राजकारनाताल्या घरानेशाहीवर कोरडे ओढले. स्वतःही केवल घराणेशाहीमुलेच राजकारणात आल्याची प्रामाणिक कबुलीही त्यानी दिली.केवल वडील व आजोबा हे सत्तेवर असल्यामुलेच मुलानी सत्ता प्राप्त करने थांबले पाहिजे असे प्रतिपादन करून अधिकाधिक तरूणानी राजकारणात यावे असे आवाहनाही त्यानी केले. महाराष्ट्रामाधे घराणेशाहीने कलस गाठला असल्याची जाणीव बहुधा राहूल गांधीना झाली असावी.
वर्षानुवर्षे सत्ता उपभोगायची,नंतर आपल्या नेतृत्वाच्या विकासासाठी पायाचे दगड झालेल्या कार्यकर्त्याना दूर सारून,आपल्या मूलाबालांसाठी सत्तेचे  दरवाजे उघडून द्यायचे,अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. वडील खासदार किंवा मंत्री,मुलगा वा मुलगी आमदार किंवा जि.प. सदस्य, अशी किंवा तत्सम चित्रे अनेक कुटुम्बामधे  आढलून  येतात.यात आक्षेप घेण्यासारखे ते काय असा प्रश्न विचारण्याचे धैर्यही ही मंडली दाखवितात. डॉक्टर चा   मुलगा डॉक्टर ,वकीलाचा मुलगा वकील, होऊ शकतो तर खासदाराचा मुलगा खासदार, वा मंत्र्याचा मुलगा मंत्री का होऊ शकत नाही असा प्रश्न ही मंडली करतात.
राजकारन्यान्च्या मूलानी राजकारणात प्रवेश करण्यास कुनाचीच काही हरकत असण्याचे कारण नाही.आक्षेप आहे तो एकापेक्षा अधिक सत्तास्थाने एकाच कुटुम्बाने अडवून ठेवन्याला! लोक्शाहीमाधे अनेक कार्यकर्ते निष्ठापूर्वक पक्षाचे काम करीत असतात. अश्या अनेक सक्षम कार्यकर्त्याना त्यांच्या नव्या नव्या कल्पना प्रत्यक्षात आणून समाजसेवा करण्याची संधी मिलने आवश्यक असते. समाजाच्या सर्वच घटकाना लोकशाही प्रक्रीयेमधे सामावून घ्यावे लागते. एकाच मतदारसंघातील विविध सत्तास्थाने एकाच कुटुम्बामधे एकवटल्याने हे सारे शकय होत नाही. या वर उपाय म्हणजे,ज्या कुटुम्बामधे सत्तेचे एक पद असेल त्या कुटुम्बामधील अन्य कुणालाही सत्तेचे अन्य पद देण्यात येऊ नये. कुटुम्बातील कुणाला राजकारणात यावयाचे असेल त्याने जरूर यावे परंतू पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्षाची व जनतेची सेवा करावी. विचारांचा वारसा घेतलेली वारस मंडली अल्पावधीतच आपला ठसा उमटवू शकतील. परंतू अनेक सक्षम कार्यकर्त्याना डावलून सत्तेचा वारसा सहजपणे प्राप्त केलेल्याना कार्यकर्तेच वेळ आल्यावर अस्मान दाखवतील.
पक्षातील घरानेशाही संपवून सामान्य परंतू कर्तृत्ववान युवकाना संधी देण्याचा राहूलजीनी व्यक्त केलेला निर्धार कांग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारा ठरेल यात शंका नाही.

Thursday, January 20, 2011

पार्किंगच्या डोकेदुखीवर योग्य इलाजाची गरज

पार्किंगच्या डोकेदुखीवर योग्य इलाजाची गरज
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ‘पार्किंग’ ही एक अलीकडे मोठी समस्या झाली आहे. विशेषत: दक्षिण मुंबईमध्ये गर्दीच्या रस्त्यावरील जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना केवळ उच्चवर्गीयांसाठी नव्हे तर मध्यमवर्गीयांना ‘पार्किंग’ ही एक मोठी डोकेदुखीच झाली आहे. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ही समस्या सोडविण्यासाठी प्रोत्साहनपर तरतुदी करून भविष्यामध्ये या समस्येवर उतारा शोधण्यात आला आहे; परंतु सुमारे ३० वर्षांपूर्वीपर्यंत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या समस्येचा सामना पुढे काही वर्षे तरी करावा लागणार आहे. कुलाब्यातील रहिवाशांनी आपल्या परीने या समस्येवर जो तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला आहे, तो कायद्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. पार्किंगच्या जागा परिसराबाहेरील व्यक्तींना नव्हे तर परिसरातील स्थानिक रहिवाशांसाठीच प्राधान्याने उपलब्ध होतील यासाठी स्थानिक व बाहेरचे यामध्ये ओळख पटविण्यासाठी ‘स्टिकर व सुरक्षा रक्षक’ अशी ही योजना असली तरी असे करणे हे बेकायदेशीर ठरेल असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. आवार भिंती नसलेल्या इमारतींमध्ये वाहने उभे करणेही शक्य नाही. जेथे वाहने उभे करण्यास मनाई नाही अशा सार्वजनिक जागेवर वाहन उभे करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ‘बाहेरील’ असल्याच्या कारणावरून कुणालाही वाहन उभे करण्यास मनाई करणे बेकायदेशीर कृत्य ठरेल व असे कृत्य दखलपात्र गुन्हा ठरू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि, रहिवाशी संघ मात्र ‘सिंगापूर मॉडेल’कडे बोट दाखवून या योजनेचे समर्थन करीत आहे. परिसरातील स्थानिक रहिवाशांकडून विशिष्ट आकार स्वीकारून रात्रीच्या वेळेमध्ये घराजवळ पार्किंग उपलब्ध करून देणारी ही योजना आहे. या योजनेमध्येही सिंगापूर प्राधिकरणाकडून पार्किंगसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना स्टिकर्स देण्यात येतात.
अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये रस्त्यांना विशिष्ट क्रमांक दिले असून हे क्रमांक सुस्पष्ट व सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित केलेले असतात. विशिष्ट क्रमांकाच्या रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनी या क्रमांकाचा उल्लेख असलेले स्वत:च्या राहत्या जागेचे विद्युत देयक दाखविल्यास २५ डॉलर प्रतिवर्षी आकारून ‘सिटी ऑफ शिकागो’ या नगर प्राधिकरणाकडून एक स्टिकर दिला जातो. स्टिकरवर वाहन क्रमांक व रस्त्याचा क्रमांक ठळकरीत्या नमूद केलेला असतो. अशा प्रकारचा, त्या विशिष्ट रस्त्याचा क्रमांक असलेला स्टिकर असलेले वाहन त्या क्रमांकाच्या रस्त्यावर रिक्त जागा असल्यास उभे राहू शकते. ही योजना राबविण्यासाठी वाहतूक खात्यामार्फत व्यक्ती/ संस्थांना अधिकार देण्यात आले आहेत. योग्य स्टिकर नसलेल्या, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनाला हुडकून काढण्याचे व त्या वाहनमालकांस ‘तिकीट’ देण्याचे काम या नेमलेल्या व्यक्ती करतात. अनधिकृतरीत्या वाहन उभे करणाऱ्या वाहन मालकास या तिकिटाचे १०० डॉलर दंड भरावा लागतो व न भरल्यास त्या रेकॉर्डच्या आधारे वाहनचालक परवान्याचे वा वाहन परवान्याचे नूतनीकरण वा तत्सम बाबी रोखल्या जातात. म्हणून शक्यतोवर, वाहनचालकांकडून अनधिकृत पार्किंग टाळले जाते. तिकीट देण्याचे काम योग्य प्रकारे व्हावे यासाठी तिकीट देणाऱ्यांना दंडाच्या सुमारे २० टक्के ही घसघशीत रक्कम दिली जाते. रस्त्यावर काही समस्या उद्भवल्यास वाहन उभे करावयास लागणाऱ्यांसाठीही या योजनेमध्ये सोय करण्यात आली आहे. याकरिता वाहनचालकांनी ‘पार्किंग लाइट्स’ सुरू ठेवून व वाहनाचे दरवाजे लॉक न करता वाहन उभे करणे आवश्यक असते. अशा प्रकारे उभ्या वाहनास तिकीट दिले जात नाही. शिकागो शहरातील या योजनेमुळे अनेक गोष्टी साध्य होत आहेत. त्याचबरोबर ‘सिटी ऑफ शिकागो’च्या महसुलामध्येही भर पडत आहे. मुख्य म्हणजे योजनेला कायदेशीर स्वरूप लाभल्याने  पार्किंगच्या डोकेदुखीवर इलाजही झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने व वाहतूक पोलिसांनी एकत्र मिळून या ‘सरदर्द’वर कायमचा उपाय करावा व परमार्थामध्ये उत्पन्न वाढीचाही स्वार्थ साधावा हे बरे.
अजित सावंत
सरचिटणीस, मुंबई काँग्रेस
ajitsawant11@yahoo.com 

Monday, January 3, 2011

आस्वाद चा रौप्य महोत्सव आणि मराठीचा झेंडा !

काल आस्वाद मधे पोहोचलो. सोबत माझी  पत्नी नीता होती.आस्वाद हे आमचे जिभेचे चोचले व तेही मराठीतून पुराविनारे आवडते ठिकाण! गेली अनेक वर्षे आम्ही येथे येतोय! अगदी नवविवाहीत होतो तेंव्हापासून! आस्वाद्चा आजचा थाट काही वेगलाच होता. प्रवेशद्वाराशीच सूर्यकांत प्रसन्ना मुद्रेने  उभे होते.२५ वर्षापूर्वी आस्वाद्ची मुहूर्तमेढ रोवनार्या श्रीकृष्ण सरजोशींचे सूर्यकांत हे ज्येष्ठ पुत्र,मराठी खाद्य संस्कृतीची पताका फद्कवीत ठेवण्याचा पित्याने घेतलेला वसा घेऊन शिवाजी पार्कच्या नाक्यावर उभे आहेत.सूर्यकान्तनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले.हातामधे चाफ्याचे फूल दिले व पेढा देऊन  तोंड गोडही केले. आस्वाद अगदी नटले होते.सूर्यकांताच्या पत्नी स्मिता आल्या गेल्याची विचारपूस करीत होत्या.  हे सारे न्याहालनार्या आईन्चा मूलातीलच तेजस्वी चेहरा कृतार्थ समाधानाने अधिकच उजलून गेला होता.अनेक वर्षे केलेल्या परिश्रमांचा हा गौरव होता.
 गेल्या २५ वर्षामधे अनेक अडचणी ,संकटे आली असतील,अधिक लाभाच्या अन्य प्रस्तावानी साद घातली असेल,तथापि महाराष्ट्राची खाद्य परम्परा टिकवून ठेवण्याचे व्रत काही सरजोशी  कुटुम्बियानी टाकले नाही हे विशेष! मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या भाविताव्याच्या चिंतेने ग्रासलेल्या चिंतातुर जन्तूनी याची नोंद घेणे आवश्यक आहे. मराठी चा सार्थ अभिमान बालगून त्यासाठी कार्यरत राहणारे व मराठीचा 'आस्वाद' सर्वदूर पोहोचाविनारे मराठीजन जोपर्यंत खिंड लढ़वित राहणार आहेत तो पर्यंत मराठीचा झेंडा फडकतच  राहणार आहे.