Wednesday, October 20, 2010
सायबर गुन्हे विषयक कायद्याची माहिती सर्वानाच हवी!
मला आलेल्या अश्लील,अपमानकारक व शिविगाल करणार्या मजकुराच्या ई मेल विषयी मी सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पूर्ण तपासांती माहिम विधानसभा मतदारासंघाचा ब्लोक अध्यक्ष हेमल जोशी याला अटक करण्यात आली. राजकीय हेव्यादाव्यातून मानसे किती खालच्या पातलीवर उतारू शकतात याचा अनुभव आला. राजकीय दृष्टया आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी अनेक डावपेच आखले जातात परन्तु मानसिकदृष्ट्या देखिल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी अशा मार्गांचा अवलम्ब केला जातो. या निमित्ताने सायबर गुन्हे अन्वेषण विभागामधे वारंवार जावे लागले. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण व तपास करताना कसास लागणारे सम्बंधित अधिकार्यांचे बुद्धिकौशल्य अचंबित करणारे होते. अश्लील वा धमकिचे एसएम्एस किंवा ई मेल,फसवणुक करण्याच्या किंवा बदनामी करण्याच्या हेतूने पाठाविलेले ई मेल आदींचा सायबर गुन्ह्यांमधे समावेश होतो.तथापि काही गुन्हे माहिती तंत्रन्यान कायद्यातील तरतूदींची माहिती नसल्याने घडतात तसेच कित्येकदा सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेलेही कायादाविषायक योग्य माहितिअभावी तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहित. संगणक हाच जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या तरूण पिढीला तर याविषयी सतर्क करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महाविद्यालये व शालाशालातुन विद्यार्थ्याना जागरूक करणारे कार्यक्रम व्हावयास हवेत. उपरोक्त गुन्ह्याचा अविरत परिश्रम करून तपास करणारे पोलिस निरीक्षक श्री मुकुंद पवार यांचे व त्यांच्या सहकार्यांचे आभार व्यक्त करताना मी त्यांचे अशा प्रकारे सायबर गुन्ह्यांसम्बन्धी योग्या मार्गदर्शन करणारे उपक्रम राबविल्याबद्दल अभिनन्दन करतो.
Sunday, October 17, 2010
एसएमएस च्या पावसामधे स्नेहाचा ओलावा कुठे?
दसर्याच्या निमित्ताने एसएम्एस चा पाऊस पडला.शुभेच्छांचे सन्देश वाचताना जीव थकून गेला.तरी बरे बऱ्याच मित्रानी पाठविलेले सन्देश सारखेच होते.'आज आहे दशहरा,प्रोब्लेम सारे विसरा.. असा सल्ला देणार्या तसेच 'सोन्यासारखी माणसे' आपली मित्र आहेत याचा अभिमान व्यक्त कर्नार्यांची संख्या बरीच होती.'पहिले तोरण दारी बांधायलाही अनेक मित्र सरसावले होते.आपले एव्हढ्या मोठ्या संख्येने मित्रा वा शुभचिंतक असावेत हे कुणालाही सुखावनारे! पण बाजारामधे रेडीमेड मिलानारे,गोड शब्दानी नटलेले हे एसएम्एस खरोखरच स्नेहाचा ओलावा निर्माण करतात का? की शुभेच्छा देन्याराची आठवण करून देउन सोपस्कार पूर्ण करतात याचा विचार सर्वानीच करायला हवा.मोबाइल कम्पन्याना प्रचंड नफा मिलवुन देणार्या या एसएम्एस उद्योगामुले या कंपन्यांचे मात्र चांगलेच उखल पांढरे होत असावे म्हणुनच हे सन्देश आकर्षक पद्धतीने लिहून घेऊन सनान्च्या अलीकडे बाजारामध्ये मोठ्या खुबीने पेरले जातात. हेच सन्देश एकाकदून दूसर्याकडे वा तेथून तिसर्याकडे वा पुन्हा सन्देश पाठाविनारयाला आभाराचा सन्देश असे चक्र फिरत रहाते. मोबाइल कंपन्यांच्या या चक्रामधे गुर्फतलेला ग्राहक राजा मात्र आपल्या जीवनातला स्नेहाचा ओलावा हरवून बसतो.
पूर्वी मित्र,नातेवाईक सनासूदीच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जात.गप्पागोष्टी होत.जुन्या आठवनीना उजाला मिळे.एकमेकांची विचारपूस होई.त्यातून नाते घट्ट होत असे.कालाच्या ओघात जीवनाच्या धकाधाकिला तोंड देता देता हे सारे कुठे हरवले हे kaLale नाही. पुढे पत्र व त्यानंतर शुभेच्छा पत्रे येऊ लागली.भेट झाली नाही तरी त्यावर मनापासून स्वतः लिहिलेल्या चार ओलीतून आपुलकी व्यक्त होई. नंतरच्या दूरध्वनीवरून प्राप्त झालेल्या शुभेच्छा ही पलिकडच्या आवाजातील जिव्हाला जाणवून देत. परंतू एसएम्एस हा नवा पर्याय मिलाल्यापासून मात्र शुभेच्छा या कोरड्या होऊ लागल्या आणि केवल सोपस्कारापूरात्या उरल्या.
एसएम्एस च्या या स्नेहाचा ओलावा हरवलेल्या पावसामध्ये कधीतरी क्वचितच एक अवचित सर येते आणि मन चिम्ब ओले करून जाते. मदर'स डे च्या निमित्ताने एका मित्राने पाठविलेला हा एक सन्देश 'लम्बी उड़ान से अपने घोसले में लौटी चिड़िया से उसके बच्चेने पूछा.. "माँ आस्मां कितना बड़ा है?" चिड़िया ने अपने बच्चोंको अपने पंखोमें समेटे हुए कहा,"सो जाओ मेरे बच्चो,वोह तो मेरे पंखों से छोटा है ".हैप्पी मदर'स डे ' हा सन्देश पाठावीनार्या या मित्राचा मी शतशः रूणी आहे त्याने माझ्या बालपणीच्या त्या सुन्दर क्षनांच्या आठवनी मला भेट दिल्या.
Saturday, October 9, 2010
बुद्धिवादी आत्मकेंद्रित विरोध समाजासाठी आत्मघातकी
शिवाजी पार्क मधे विशिष्ट मर्यादेमधे राजकीय मेलावे होण्यास काही हरकत नसावी असे माझे मत आहे कारण लोकाशाहीमाधे भाषण स्वातन्त्र्य व मत स्वातंत्र्य असताना त्यासाठी जागा उपलब्ध नसावी म्हणजे एक प्रकारे अशा स्वातंत्र्याची गलचेपीच ठरेल.तसेच कोली महोत्सव,मालवणी जत्रा,कोल्हापूर महोत्सव,करीअर फेसिवल,ग्रन्थ जत्रा,एवढेच काय अगदी वडा पाँव सम्मेलनासुद्धा समाजाची गरज आहे.सांस्कृतिक जडघडनिसाठी हे सारे आवश्यक आहे.शिवाजी पार्क परिसरातील नागारिकाना होणारा ध्वनि प्रदूषण व अन्य त्रास जरी मान्य केले तरी राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमाना बंदी घालने समाजासाठी आत्माघाताकी असू शकेल.शिवाजी पार्क च्या परिसरातील नागरिकाना जसा ध्वनि प्रदूषनाचा त्रास होतो तसाच त्रास किंबहुना जास्त त्रास या शहरामधे रेल्वे लाईनच्या लगत झोपदपत्त्यातुन,चालीतून रहानार्या लाखो लोकाना होत असतो.त्यावर उपाय निघाले तर उत्तमच परन्तु व्यापक हिताच्या द्रुश्तिकोनातून असे त्रास सहन करने अपरिहार्य ठरते. मध्ध्यन्तरी शिवाजी पार्क च्या नाक्यावर व रानडे रोडवर होणार्या स्कायवोकलाही विरोध झाला व योजना हानून पाडण्यात आली.आजच या ठिकाणी रस्ता ओलांडताना शाळेत जाणारी मुले,महीला, व वृद्धांची होणारी ताराम्बल पाहिली तर भविष्यामधे वाधनारी वाहतूक लक्षात घेता पुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार विरोध करानार्यानी केला नसावा असे वाटते. अन्यथा त्यानी विधायक सूचना केल्या असत्या.
समाजातील बुद्धिवादी उच्चभ्रू वर्ग कधी कधी आत्मकेंद्रित होऊंन आक्रामक होतो व समस्यांकडे कोणत्या नजरेतून पहातो याची ही उदाहरणे आहेत.दुर्दैवाने राजकीय पक्ष व संघटना आणि लोकप्रतिनिधीही या समोर नांगी टाकून, दिशा दर्शाकाचे काम करण्याऐवजी सूरात सूर मिसलतात व लोकप्रियता मिलाविन्याच्या स्पर्धेमधे आपण मागे तर रहाणार नाही ना? याची कालजी घेतात. यातूनच स्वतःपुरेसा विचार करनार्यांची भीड़ चेपत जाते.
Saturday, October 2, 2010
अयोध्या निर्णय : बोध घेण्याची गरज
अयोध्या प्रकरणी झालेल्या निर्णयाचे स्वागत करीत असताना या निर्नयातुन सर्वानीच बोध घ्यावयास हवा. या देशामधे न्यायपालिका ही स्वतंत्र वा सार्वभौम आहे हे या निर्नायामुले पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.म्हणुनच कोणत्याही प्रश्नावर कायदा हाती घेन्याऐवजि प्रश्न कायद्याच्या कक्षेताच सोडाविने देशाहिताच्या दृष्टीने योग्य ठरते हा वस्तुपाठच या निर्णयाने घालून दिला आहे. जनतेनेही या सम्बन्धी संयम व ऐक्याचे दर्शन घडवून न्यायव्यवास्थेवर विश्वास दर्शवुन हे मान्य केले आहे हे विशेष!
या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रीया व मते यांचा मागोवा घेत असताना मला न्या.एस.यु.खान यानी निर्णय देताना व्यक्त केलेल्या भावना तसेच महाराष्ट्र टाईम्सच्या दी.१ अक्टूबर,१० च्या अन्कामधे,श्री.विनय उपासनी या कारसेवकाने 'एक होता कारसेवक' या लेखाद्वारे व्यक्ता केलेले विचार खूपच भावले.
न्या. खान यानी निकालपत्रामधे भारतीय मुस्लिम समाजाला आवाहन करताना म्हटले आहे - "मुसलामनानी ईतरान्बरोबर कसा व्यवहार राखावा याबाबत इस्लामची नेमकी शिकवण काय आहे हे जग आज जाणू इच्छिते.शांतता - मैत्री - संयम या संदेशाद्वारे संधि मिळेल तेंव्हा दुसर्याशी संवाद साधायचा की संधी मिळेल तेंव्हा दुसर्यावर हल्ला चढ़वायाचा - नेमके काय? भारतीय मुस्लिमाना धार्मिक न्यानपरम्परा आहे.त्यामुले ते जगात आज सर्वोत्तम स्थानावर आहेत.त्याना आता संघर्ष संपविन्याची भूमिका पार पादन्याची ऐतिहासिक संधी लाभत आहे."(लोकसत्ता १ ऑक्टो.१०).
दी.६ डिसेंबर,९२ च्या त्या कृत्यामधे 'कारसेवक' म्हणून सहभागी झालेले श्री विनय उपासनी आपल्या लेखामधे म्हणतात- "आज १८ वर्षानंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयास्थापाने पहाताना मन निराश होतय.तो उन्माद,तो जोश,तो कट्टरपना,तो साहसवाद ...सारसार गलुन पडलाय. बाबरी पतानानंतर देशात,मुमबईत उसललेली दंगल,बोम्ब्स्फोट मालिका,गुजरातची दंगल,'ते' आणि 'आपण' यात रुन्दावलेली दरी,हजारो निरापराधांचे बळी,दुभंगालेली मने,राजकारान्यांचा स्वार्थीपना,देश म्हणून झालेले नुकसान,हाती के लागल याची कैलक्युलेशन या सर्वांची टोटल एकच झाली,जे झाल,जे केल ते नक्कीच कौतुकास्पद नव्हत.काय मिळाल अस करून हाच एक प्रश्न मनात आहे."
उपरोक्त दोन्ही प्रतिक्रया अंतर्मुख करायला लावानार्या आहेत.निकालाविरुधा अपीलामधे जान्याच तयारी दोन्ही बाजुकडून केली जाते.तो त्यांचा अधिकारही आहे. किंबहुना निर्णय मान्य नसल्यास अन्य द्वेषपूर्ण मार्ग स्वीकारान्यापेक्षा न्यायचा मार्ग चोखालने उत्तम! परन्तु काही खोडसाळ लोक सोडले तर वर उल्लेखिलेल्या प्रतिक्रीयांशी दोन्ही बाजूचे बहुतांशा विचारी लोक व सर्वसामान्य जनाताही सहमत असेल यात शंका नाही.म्हणुनच या निकालापासून योग्य बोध घेण्याची गरज असून या निकालाची अमलबजावणी सामोपचाराने चर्चेने ऐकमेकान्विशायी आदर व बंधुभाव जोपासुन झाल्यास या देशाच्या इतिहासातील ती अत्यंत आदर्श असे उदाहरण ठरेल व जगासमोर भारत ताठ मानेने उभा राहून सांगू शकेल "हम सब एक है"
Monday, July 5, 2010
Band Kashasathi
आजचा भारत बंद म्हणजे आपले उरले सुरले अस्तित्व दाखविण्याचा विरोधी पक्षांचा केविलवाणा प्रयत्न आहे. वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे हे जरी मान्य केले तरी जनतेला वेठीस धरनारे बंद सारखे आन्दोलन हाच एक मात्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा मार्ग आहे का? याचा गंभीरपणे विचार व्हावयास हवा.कोत्यावधि कामाचे तास वाया,उत्पादनामाधे खंड,कामगार आणि मध्यम्वार्गियांचे रोज्गाराचे नुकसान, रुगनांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल या मुले के साध्य होणार. अगदी प्रतीकात्मक निषेध नोंदवायचे म्हटले तरी महात्मा गांधींच्या या देशामधिल विविध पक्षीय कर्यकर्त्याना सत्याग्रहसाह आत्मक्लेशाचे अनेक मार्ग परिचित आहेत.असे असताना "बंद" द्वारे आपली शक्ति दाखविण्याचा अट्टहास कशासाठी? बंद यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करनार्याना आता कोर्टाचा बडगा मिलावा हीच अपेक्षा.
Sunday, April 4, 2010
mothhyanche maatiche motthe paay
महाराष्ट्र तईम्सच्या आजच्या अंकातील सुरेश भटेवरा यानि लिहिलेला 'मातीचे पाय' हा अतिशय माहितीपूर्ण लेख वाचला.अनेक मोठमोठे लोक अमिताभची पालखी उचलान्यामाधे मग्न असताना भटेवरा यानि लोकप्रिय असलेल्या व्यक्तिमात्वाचे खरे रूप दाखविण्याचा केलेला प्रयत्न हे एक मोठे धारिश्त्या म्हानावायास हवे. या बद्दल भटेवरा हे अभिनान्दानस पात्र आहेत.लोकामाताबरोबर वाहत न जाता सत्य लोकांसमोर ठेवण्याचे काम खरोखरच कठिन असते.
स्वर्गीय राजीवजिंसोबत असलेली अमिताभची मैत्री व त्यामुले निर्माण जालेली परिस्थिति आणि उद्भ्वालेले ताण-ताणाव याना तोंड देत राजिवजिनी आपल्या ह्या मित्राला मदत करण्याचे केलेले प्रयत्न राजिवाजिंचे व्यक्तिमत्व आधिक उजळ करतात व त्याचबरोबर अमिताभच्या कृताघ्नातेवर ही प्रकाश टाकतात.लन्दन स्थित सोलिसिटर ज़रीवाला यांची बच्चन बन्धुन्कडून जालेली फसवणुक देखिल अमिताभच्या व्यक्तिमत्वाची कालिकुट्टा बाजु समोर ठेवतात.
अमरासिंगांच्या बरोबरचा अमिताभचा दोस्ताना व आज नरेंद्र मोदींचा धरलेला हात ही अमिताभच्या संधिसाधू वर्तानाची गवाही देणारी उदाहराने आहेत यात शंका नाही.अमिताभ कलाकार म्हणून कितीही मोठा आसला तरी त्याचे पाय मातीचे आहेत हेच शेवटी खरे हे त्याच्या चाहत्यानाही मान्य करावेच लागेल.
स्वर्गीय राजीवजिंसोबत असलेली अमिताभची मैत्री व त्यामुले निर्माण जालेली परिस्थिति आणि उद्भ्वालेले ताण-ताणाव याना तोंड देत राजिवजिनी आपल्या ह्या मित्राला मदत करण्याचे केलेले प्रयत्न राजिवाजिंचे व्यक्तिमत्व आधिक उजळ करतात व त्याचबरोबर अमिताभच्या कृताघ्नातेवर ही प्रकाश टाकतात.लन्दन स्थित सोलिसिटर ज़रीवाला यांची बच्चन बन्धुन्कडून जालेली फसवणुक देखिल अमिताभच्या व्यक्तिमत्वाची कालिकुट्टा बाजु समोर ठेवतात.
अमरासिंगांच्या बरोबरचा अमिताभचा दोस्ताना व आज नरेंद्र मोदींचा धरलेला हात ही अमिताभच्या संधिसाधू वर्तानाची गवाही देणारी उदाहराने आहेत यात शंका नाही.अमिताभ कलाकार म्हणून कितीही मोठा आसला तरी त्याचे पाय मातीचे आहेत हेच शेवटी खरे हे त्याच्या चाहत्यानाही मान्य करावेच लागेल.
Subscribe to:
Posts (Atom)