Monday, July 5, 2010
Band Kashasathi
आजचा भारत बंद म्हणजे आपले उरले सुरले अस्तित्व दाखविण्याचा विरोधी पक्षांचा केविलवाणा प्रयत्न आहे. वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे हे जरी मान्य केले तरी जनतेला वेठीस धरनारे बंद सारखे आन्दोलन हाच एक मात्र सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा मार्ग आहे का? याचा गंभीरपणे विचार व्हावयास हवा.कोत्यावधि कामाचे तास वाया,उत्पादनामाधे खंड,कामगार आणि मध्यम्वार्गियांचे रोज्गाराचे नुकसान, रुगनांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल या मुले के साध्य होणार. अगदी प्रतीकात्मक निषेध नोंदवायचे म्हटले तरी महात्मा गांधींच्या या देशामधिल विविध पक्षीय कर्यकर्त्याना सत्याग्रहसाह आत्मक्लेशाचे अनेक मार्ग परिचित आहेत.असे असताना "बंद" द्वारे आपली शक्ति दाखविण्याचा अट्टहास कशासाठी? बंद यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करनार्याना आता कोर्टाचा बडगा मिलावा हीच अपेक्षा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment