या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रीया व मते यांचा मागोवा घेत असताना मला न्या.एस.यु.खान यानी निर्णय देताना व्यक्त केलेल्या भावना तसेच महाराष्ट्र टाईम्सच्या दी.१ अक्टूबर,१० च्या अन्कामधे,श्री.विनय उपासनी या कारसेवकाने 'एक होता कारसेवक' या लेखाद्वारे व्यक्ता केलेले विचार खूपच भावले.
न्या. खान यानी निकालपत्रामधे भारतीय मुस्लिम समाजाला आवाहन करताना म्हटले आहे - "मुसलामनानी ईतरान्बरोबर कसा व्यवहार राखावा याबाबत इस्लामची नेमकी शिकवण काय आहे हे जग आज जाणू इच्छिते.शांतता - मैत्री - संयम या संदेशाद्वारे संधि मिळेल तेंव्हा दुसर्याशी संवाद साधायचा की संधी मिळेल तेंव्हा दुसर्यावर हल्ला चढ़वायाचा - नेमके काय? भारतीय मुस्लिमाना धार्मिक न्यानपरम्परा आहे.त्यामुले ते जगात आज सर्वोत्तम स्थानावर आहेत.त्याना आता संघर्ष संपविन्याची भूमिका पार पादन्याची ऐतिहासिक संधी लाभत आहे."(लोकसत्ता १ ऑक्टो.१०).
दी.६ डिसेंबर,९२ च्या त्या कृत्यामधे 'कारसेवक' म्हणून सहभागी झालेले श्री विनय उपासनी आपल्या लेखामधे म्हणतात- "आज १८ वर्षानंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयास्थापाने पहाताना मन निराश होतय.तो उन्माद,तो जोश,तो कट्टरपना,तो साहसवाद ...सारसार गलुन पडलाय. बाबरी पतानानंतर देशात,मुमबईत उसललेली दंगल,बोम्ब्स्फोट मालिका,गुजरातची दंगल,'ते' आणि 'आपण' यात रुन्दावलेली दरी,हजारो निरापराधांचे बळी,दुभंगालेली मने,राजकारान्यांचा स्वार्थीपना,देश म्हणून झालेले नुकसान,हाती के लागल याची कैलक्युलेशन या सर्वांची टोटल एकच झाली,जे झाल,जे केल ते नक्कीच कौतुकास्पद नव्हत.काय मिळाल अस करून हाच एक प्रश्न मनात आहे."
उपरोक्त दोन्ही प्रतिक्रया अंतर्मुख करायला लावानार्या आहेत.निकालाविरुधा अपीलामधे जान्याच तयारी दोन्ही बाजुकडून केली जाते.तो त्यांचा अधिकारही आहे. किंबहुना निर्णय मान्य नसल्यास अन्य द्वेषपूर्ण मार्ग स्वीकारान्यापेक्षा न्यायचा मार्ग चोखालने उत्तम! परन्तु काही खोडसाळ लोक सोडले तर वर उल्लेखिलेल्या प्रतिक्रीयांशी दोन्ही बाजूचे बहुतांशा विचारी लोक व सर्वसामान्य जनाताही सहमत असेल यात शंका नाही.म्हणुनच या निकालापासून योग्य बोध घेण्याची गरज असून या निकालाची अमलबजावणी सामोपचाराने चर्चेने ऐकमेकान्विशायी आदर व बंधुभाव जोपासुन झाल्यास या देशाच्या इतिहासातील ती अत्यंत आदर्श असे उदाहरण ठरेल व जगासमोर भारत ताठ मानेने उभा राहून सांगू शकेल "हम सब एक है"
No comments:
Post a Comment