पूर्वी मित्र,नातेवाईक सनासूदीच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जात.गप्पागोष्टी होत.जुन्या आठवनीना उजाला मिळे.एकमेकांची विचारपूस होई.त्यातून नाते घट्ट होत असे.कालाच्या ओघात जीवनाच्या धकाधाकिला तोंड देता देता हे सारे कुठे हरवले हे kaLale नाही. पुढे पत्र व त्यानंतर शुभेच्छा पत्रे येऊ लागली.भेट झाली नाही तरी त्यावर मनापासून स्वतः लिहिलेल्या चार ओलीतून आपुलकी व्यक्त होई. नंतरच्या दूरध्वनीवरून प्राप्त झालेल्या शुभेच्छा ही पलिकडच्या आवाजातील जिव्हाला जाणवून देत. परंतू एसएम्एस हा नवा पर्याय मिलाल्यापासून मात्र शुभेच्छा या कोरड्या होऊ लागल्या आणि केवल सोपस्कारापूरात्या उरल्या.
एसएम्एस च्या या स्नेहाचा ओलावा हरवलेल्या पावसामध्ये कधीतरी क्वचितच एक अवचित सर येते आणि मन चिम्ब ओले करून जाते. मदर'स डे च्या निमित्ताने एका मित्राने पाठविलेला हा एक सन्देश 'लम्बी उड़ान से अपने घोसले में लौटी चिड़िया से उसके बच्चेने पूछा.. "माँ आस्मां कितना बड़ा है?" चिड़िया ने अपने बच्चोंको अपने पंखोमें समेटे हुए कहा,"सो जाओ मेरे बच्चो,वोह तो मेरे पंखों से छोटा है ".हैप्पी मदर'स डे ' हा सन्देश पाठावीनार्या या मित्राचा मी शतशः रूणी आहे त्याने माझ्या बालपणीच्या त्या सुन्दर क्षनांच्या आठवनी मला भेट दिल्या.
संपूर्णपणे सहमत आहे. भगवंत
ReplyDelete