Sunday, April 4, 2010

mothhyanche maatiche motthe paay

 महाराष्ट्र तईम्सच्या आजच्या अंकातील सुरेश भटेवरा यानि लिहिलेला 'मातीचे पाय' हा अतिशय माहितीपूर्ण लेख वाचला.अनेक मोठमोठे  लोक अमिताभची पालखी उचलान्यामाधे   मग्न असताना भटेवरा  यानि लोकप्रिय असलेल्या व्यक्तिमात्वाचे  खरे रूप दाखविण्याचा केलेला प्रयत्न हे एक  मोठे धारिश्त्या  म्हानावायास हवे. या बद्दल भटेवरा  हे अभिनान्दानस  पात्र आहेत.लोकामाताबरोबर  वाहत न जाता सत्य लोकांसमोर ठेवण्याचे काम खरोखरच कठिन असते.
स्वर्गीय राजीवजिंसोबत असलेली अमिताभची मैत्री व त्यामुले निर्माण जालेली परिस्थिति आणि उद्भ्वालेले  ताण-ताणाव याना तोंड देत राजिवजिनी आपल्या ह्या मित्राला  मदत करण्याचे  केलेले प्रयत्न राजिवाजिंचे व्यक्तिमत्व आधिक उजळ करतात व त्याचबरोबर अमिताभच्या कृताघ्नातेवर ही प्रकाश टाकतात.लन्दन स्थित सोलिसिटर ज़रीवाला यांची बच्चन बन्धुन्कडून जालेली फसवणुक देखिल अमिताभच्या व्यक्तिमत्वाची कालिकुट्टा  बाजु समोर ठेवतात.
अमरासिंगांच्या  बरोबरचा अमिताभचा दोस्ताना व आज नरेंद्र मोदींचा धरलेला हात ही अमिताभच्या संधिसाधू वर्तानाची गवाही देणारी उदाहराने आहेत यात शंका नाही.अमिताभ कलाकार म्हणून कितीही मोठा आसला तरी त्याचे पाय मातीचे आहेत हेच शेवटी खरे हे त्याच्या चाहत्यानाही मान्य करावेच लागेल.

1 comment:

  1. कलाकारान्कडे कलाकार म्हणूनच पहावे. त्यांना डोक्यावर घेऊन त्यांची पूजा करू नये. आपण अगदी रास्त मत दिले आहे.

    ReplyDelete