गेल्या २५ वर्षामधे अनेक अडचणी ,संकटे आली असतील,अधिक लाभाच्या अन्य प्रस्तावानी साद घातली असेल,तथापि महाराष्ट्राची खाद्य परम्परा टिकवून ठेवण्याचे व्रत काही सरजोशी कुटुम्बियानी टाकले नाही हे विशेष! मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या भाविताव्याच्या चिंतेने ग्रासलेल्या चिंतातुर जन्तूनी याची नोंद घेणे आवश्यक आहे. मराठी चा सार्थ अभिमान बालगून त्यासाठी कार्यरत राहणारे व मराठीचा 'आस्वाद' सर्वदूर पोहोचाविनारे मराठीजन जोपर्यंत खिंड लढ़वित राहणार आहेत तो पर्यंत मराठीचा झेंडा फडकतच राहणार आहे.
Monday, January 3, 2011
आस्वाद चा रौप्य महोत्सव आणि मराठीचा झेंडा !
काल आस्वाद मधे पोहोचलो. सोबत माझी पत्नी नीता होती.आस्वाद हे आमचे जिभेचे चोचले व तेही मराठीतून पुराविनारे आवडते ठिकाण! गेली अनेक वर्षे आम्ही येथे येतोय! अगदी नवविवाहीत होतो तेंव्हापासून! आस्वाद्चा आजचा थाट काही वेगलाच होता. प्रवेशद्वाराशीच सूर्यकांत प्रसन्ना मुद्रेने उभे होते.२५ वर्षापूर्वी आस्वाद्ची मुहूर्तमेढ रोवनार्या श्रीकृष्ण सरजोशींचे सूर्यकांत हे ज्येष्ठ पुत्र,मराठी खाद्य संस्कृतीची पताका फद्कवीत ठेवण्याचा पित्याने घेतलेला वसा घेऊन शिवाजी पार्कच्या नाक्यावर उभे आहेत.सूर्यकान्तनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले.हातामधे चाफ्याचे फूल दिले व पेढा देऊन तोंड गोडही केले. आस्वाद अगदी नटले होते.सूर्यकांताच्या पत्नी स्मिता आल्या गेल्याची विचारपूस करीत होत्या. हे सारे न्याहालनार्या आईन्चा मूलातीलच तेजस्वी चेहरा कृतार्थ समाधानाने अधिकच उजलून गेला होता.अनेक वर्षे केलेल्या परिश्रमांचा हा गौरव होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment